
देशातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांमध्ये किमान सरासरी रक्कम ठेवण्याबाबत नियम बदलला असून आता कमीत कमी 50 हजार रुपये खात्यावर ठेवावे लागणार आहेत. 1 ऑगस्ट 2025 नंतर बँकेत उघडलेल्या सर्व खातेदारांसाठी हा नियम लागू राहणार आहे. यापूर्वी खात्यावरील किमान रक्कम 10 हजार होती.
आयसीआयसीआय बँकेने खात्यावरील किमान रकमेबाबत नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. यामध्ये निमशहरी शाखेतील बँक खात्यासाठी किमान सरासरी रक्कम ही पाच हजार रुपयांवरून 25 हजार रुपये करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागातील खात्यांसाठी किमान शिल्लक अडीच हजारांवरून 10 हजार रुपये केली आहे. तर बँकेत रोख रक्कम महिनाभरात तीन वेळा कोणत्याही शुल्काशिवाय जमा करण्यात येईल. याची मर्यादा एक लाख रुपये असेल. तर यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये आकारले जातील.
…अन्यथा 6 टक्के किंवा 500 रुपये दंड
– बँकेचे जे खातेदार किमान सरासरी रक्कम आपल्या खात्यावर शिल्लक ठेवणार नाहीत त्यांना रकमेच्या सहा टक्के किंवा 500 रुपये यामध्ये जी कमी रक्कम असेल तो दंड वसूल केला जाईल. म्हणजेच 50 हजार रुपये शिल्लक ठेवण्यास 10 हजार रुपये कमी पडत असतील तर 600 रुपये किंवा 500 रुपयांचा दंड होईल.