आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

राहाता तालुक्यातील लोणीजवळच्या चंद्रापुर येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. लोणी-संगमनेर रस्त्यावर आयटीआय कॉलेज जवळ बँकेची शाखा आहे. लोणी जवळच असलेल्या चंद्रापुर येथील आयडीबीआय बँकेचे एटीएममधील कॅशबॉक्स कटरच्या साहाय्याने कापण्यात चोरट्यांना अपयश आलेचोरी करताना चोरट्यांनी हुशारीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रेचा वापर केला.

त्यामुळे या चोरीचा प्रकार या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद हौऊ शकला नाही. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या