आयडॉलला मिळाली नवी ओळख,  यूजीसीच्या निर्देशानुसार दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या नावात ‘सीडीओई’ असा बदल

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) नावात बदल करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) दूरस्थ शिक्षण 2020 च्या नियमावलीनुसार आयडॉलचे नाव ‘दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण पेंद्र’ (सेंटर फॉर डिस्टन्स अॅण्ड ऑनलाईन एज्युकेशन) सीडीओई असे करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये आयडॉलचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. दूरस्थ शिक्षणासोबतच भविष्यात अनेक ऑनलाईन अभ्यासक्रम याद्वारे सुरू करण्यात येणार आहेत.

देशातील सर्व मुक्त विद्यापीठे व दूरस्थ शिक्षण देणाया संस्थांसाठी यूजीसीने 2020 मध्ये नियमावली जाहीर केली. त्यामध्ये देशातील सर्व दूरस्थ शिक्षण संस्थेचे नावदेखील सारखे असावे यासाठी दूरस्थ शिक्षण देणाया संस्थांना ‘सेंटर फॉर डिस्टन्स अॅण्ड ऑनलाईन एज्युकेशन’ (सीडीओई) असे नामकरण करणे अनिवार्य केले.

– नाव बदलामुळे दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण पेंद्रामार्फत दूरस्थ शिक्षणासोबत अनेक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना आहे.
– सुरुवातीला पाली भाषा व इंग्रजी भाषेतील काही प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम व एमए समाजशास्त्र हे अभ्यासक्रम ऑनलाईनद्वारे सुरू करण्यात येतील.
– यानंतर इतर अभ्यासक्रमही ऑनलाईन करण्याचा मानस या पेंद्राचा आहे, असे या सीडीओईचे प्रभारी संचालक डॉ. संतोष राठोड यांनी सांगितले.
– मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण पेंद्रात सध्या 24 अभ्यासक्रम आहेत. पदवीस्तरावर एकूण 5 अभ्यासक्रम तर पदव्युत्तर स्तरावर एकूण 19 अभ्यासक्रम दूरस्थ माध्यमातून उपलब्ध आहेत.

मुंबई विद्यापीठ आता पॅटेगरी-1 विद्यापीठ झाले आहे. आयडॉलच्या नावात सीडीओई असा बदल झाल्याने मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राची कक्षा जगभर रुंदावली आहे. या सीडीओई केंद्रामार्फत दूरस्थ शिक्षणासोबत अनेक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील व ते जगभरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील.
– प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू मुंबई विद्यापीठ