तुमच्याही घरातील फरशीवर काळे डाग पडलेत, ही ट्रिक वापरुन बघा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घर कितीही सुंदर सजवले असले तरी, निस्तेज किंवा काळी पडलेली फरशी त्याचा एकूण लूक खराब करू शकते. दररोजची धूळ, घाण, स्वयंपाकघरातील ग्रीस आणि मुलांचा खोडसाळपणा यामुळे फरशीची अवस्था पाहण्यासारखी होते. महागडे क्लीनर वापरुनही हवे ते परीणाम मिळत नाहीत. फरशी आरशासारखी चमकण्यासाठी काही साध्या सोप्या गोष्टी सुद्धा परीणामकारक ठरतात.

फक्त पचनासाठी नाही तर, गाईचे तूप आपल्या एकूण आरोग्यासाठी सर्वात बेस्ट

प्रथम, एक बादली स्वच्छ पाण्याने भरा. एक चमचा रॉक सॉल्ट घाला. मीठ घाण सोडण्यास मदत करते. नंतर थोडा शॅम्पू घाला. तुम्ही शॅम्पूऐवजी लिक्विड हँड सोप देखील वापरू शकता. हे मिश्रण हलके ग्रीस काढून टाकण्यास आणि चमक वाढविण्यास मदत करते. आता पाण्यात एक मॉप बुडवा, ते पिळून घ्या. त्यानंतर फरशीवर आणि कोपऱ्यांवर व्यवस्थित पुसून घ्या. अशा प्रकारे पिवळेपणा येण्याची शक्यता कमी होते.

वजन कमी करण्यासाठी चवळी आहे सर्वात बेस्ट, जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे

तुम्हाला तुमच्या जमिनीवर जुने डाग दिसले तर एका कपमध्ये थोडे पाणी घ्या आणि त्यात बेकिंग सोडा मिसळून जाड पेस्ट बनवा. डाग असलेल्या भागावर ही पेस्ट लावा. डाग सैल होण्यासाठी सुमारे १५-२० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर, ओल्या कापडाने किंवा मोपने ती जागा घासून घ्या. ही पद्धत विशेषतः स्वयंपाकघराजवळ किंवा जास्त रहदारी असलेल्या भागात उपयुक्त आहे. पेस्ट सुकू देऊ नका, अन्यथा ती स्वच्छ होण्यास वेळ लागेल.

पांढरा की लाल? कोणता कांदा आपण खायला हवा

फरशी घाणेरडी नसेल तर कोमट पाणी देखील पुरेसे आहे. कोमट पाण्याने पुसल्याने साचलेली धूळ लवकर निघून जाते आणि फरशी स्वच्छ दिसते. ही पद्धत दैनंदिन स्वच्छतेसाठी चांगली आहे. लिंबाच्या रसाचे काही थेंब देखील घालू शकता, ज्यामुळे सौम्य सुगंध येईल.