
काही वेळा चुकून गुन्ह्यात नाव येते. गुन्हा एकाने केलेला असतो परंतु, दुसऱयाला तो भोगावा लागतो. त्यामुळे असे जर झाले तर घाबरून जाऊ नका. शांतपणे विचार करा.
सर्वात आधी कोणत्या गुन्ह्यात नाव आले, ते का आले, याची चौकशी करा. त्यानंतर तत्काळ वकिलाची भेट घेऊन त्यांना हे प्रकरण सांगा. वकील तुम्हाला नक्कीच मदत करतील.
पोलीस चौकशीसाठी आले तर घाबरून जाऊ नका. त्यांना सहकार्य करा. त्यांना समजून सांगा. चुकीच्या पद्धतीने नाव आल्याचे त्यांना सांगा.
ज्या गुन्ह्यात तुमचे नाव आले आहे, त्या एफआयआरची प्रत मिळवा. तुमच्या निर्दोषत्वाचे पुरावे, जसे की मेसेज, फोटो, बँक स्टेटमेंट किंवा साक्षीदार, गोळा करा.
गुन्हा खोटा आणि तथ्यहीन असेल तर तुमचा वकील कोर्टात गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करून तुमची बाजू मांडू शकतो किंवा गुन्हा रद्द करण्याची विनंती करू शकतो.

























































