हे करून पहा- गुडघेदुखी वाढली असेल तर…

हिवाळ्यात बऱयाच जणांना गुडघेदुखीचा त्रास वाढतो. त्यामुळे प्रत्येक हिवाळ्यात गुडघेदुखी होऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वात आधी जर गुडघेदुखी होत असेल तर गुडघ्यावर जास्त भार देऊ नका. गुडघ्याला सूज असेल तर एका टॉवेलमध्ये बर्फ गुंडाळून 15 ते 20 मिनिटे गुडघ्यावर ठेवा.

गुडघेदुखीसाठी हळद आणि आल्याचा चहा पिणे किंवा ते तेलात गरम करून मालिश करणे फायदेशीर ठरू शकते. जमिनीवर गुडघे टेकून बसणे टाळा. खुर्चीचा वापर करा. चालताना वॉकिंग स्टिकचा वापर केल्यास गुडघ्यांवरील ताण कमी होतो. गुडखेदुखीसाठी कोणतेही औषध हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.