
- मोबाइल स्क्रीन टाइम वाढल्याच्या तक्रारी अनेक पालक करतात. मुले घरात आल्याबरोबर मोबाइल घेऊन बसतात. अनेक मुलांना तर जेवतानाही मोबाइल हवा असतो.
- जर तुमच्या मुलाचा मोबाइल स्क्रीन खूपच वाढला असेल आणि तो कमी करायचा असेल तर काही सोपे उपाय करा. मोबाइलचा स्क्रीन टाइम वाढल्याने शारीरिक हालचाली मंदावतात.
- फोनचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी दिवसभरात डिजिटल ब्रेक घेण्याची सवय लावा. जेवणाच्या वेळी आणि घरात कुणाशी बोलत असताना मोबाइल वापरणे टाळा.
- टीव्ही किंवा मोबाइल पाहण्याऐवजी कोणतीही पुस्तके वाचा, बोर्ड गेम्स खेळा किंवा मैदानात फिरायला जा. दिवसभरात मोबाइल वापरण्याची वेळ निश्चित करा.
- छोटे मूल सतत मोबाइल पाहत असेल तर पालकांनी मोबाइलचा पासवर्ड मुलांना देऊ नये. मुलाच्या हट्टाकडे दुर्लक्ष करावे. त्याच्याशी अन्य विषयांवर बोलावे.