
पोट साफ न होण्याच्या समस्येने सध्याच्या घडीला अनेकजण त्रस्त आहेत. पोट साफ न झाल्याने, कामातही मन लागत नाही. बद्धकोष्ठता ही एक सामान्य परंतु त्रासदायक समस्या आहे. सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही तेव्हा दिवसभर थकवा, जडपणा आणि चिडचिड जाणवते. ही समस्या असंतुलित आहार, शरीरातील पाण्याची कमतरता आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे होऊ शकते. परंतु चांगली गोष्ट म्हणजे काही घरगुती उपायांचा अवलंब करून, या समस्येपासून सहज सुटका मिळवता येते. रात्री झोपण्यापूर्वी काही पदार्थांचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते. काही नैसर्गिक आणि प्रभावी उपायांनी बद्धकोष्ठता कायमची दूर करण्यास मदत होते.
आपल्या आहारात उडदाची डाळ समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
पोट साफ होण्यासाठी महत्त्वाचे घरगुती उपाय
एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा आणि एक चमचा बडीशेप पाण्यात घालून पाणी चांगले उकळवावे. त्यानंतर हे पाणी गाळून घेऊन, झोपण्यापूर्वी थंड किंवा कोमट प्यावे. यामुळे गॅस आणि अपचन दूर होते आणि पोट साफ होते.
एक ग्लास गरम दुधात एक चमचा तूप मिसळा. रात्री झोपण्यापूर्वी ते प्या. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.
एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. त्यात चिमूटभर मीठ किंवा एक चमचा मध घाला. झोपण्यापूर्वी ते प्यायल्याने पचनसंस्था सक्रिय होते आणि सकाळी पोट स्वच्छ होते.
आयुर्वेदात, त्रिफळा पावडर पचन सुधारण्यासाठी ओळखली जाते. कोमट पाण्यात १-२ चमचे त्रिफळा पावडर मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी ते प्या. यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
बद्धकोष्ठता होण्याची महत्त्वाची कारणे
पुरेसे पाणी न पिल्याने मल कठीण होतो.
मानसिक ताण पचनसंस्थेवर परिणाम करतो.
दिवसभर एकाजागी बसून काम केल्यामुळे बद्धकोष्ठता वाढण्याचा धोका असतो.
फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने पचन बिघडते.
बद्धकोष्ठता दूर करणारे इतर उपाय
फायबरयुक्त पदार्थ आहारात सर्वात जास्त समाविष्ट करावेत. जसे की, पपई, सफरचंद, पेरू, भेंडी, पालक, गाजर, ओट्स इ.
दररोज ३० मिनिटे चालण्याचा व्यायामही खूप उपयोगाचा आहे.
आपल्या शरीराला दिवसभर पाणी पिऊन हायड्रेटेड करणेही तितकेच गरजेचे आहे.
योग आणि ध्यानधारणा यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळण्यास मदत होते. यामुळेही आपले पचन सुधारण्यास मदत होते.