IFFI 2023 ‘एंडलेस बॉर्डर्स’ने पटकावला सुवर्ण मयूर

54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) अब्बास अमिनी यांच्या ‘एंडलेस बॉर्डर्स’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कार पटकावला आहे. 40 लाख रुपये, प्रमाणपत्र आणि ‘सुवर्ण मयूर’ पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाच्या इफ्फी महोत्सवात प्रतिष्ठsच्या ‘सुवर्ण मयूर’ पुरस्काराच्या स्पर्धेत 12 आंतरराष्ट्रीय आणि तीन हिंदुस्थानी चित्रपट होते. मानव आणि निसर्ग यांच्यातील वैचारिक संघर्षाचा शोध घेणाऱया ‘कांतारा’साठी अभिनेता ऋषभ शेट्टी याला विशेष ज्यूरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   गोव्यात सुरू असलेल्या इफ्फी महोत्सवाची सांगता मंगळवारी झाली. यंदाच्या ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कार कोण पटकावणार याकडे साऱयांचे लक्ष लागले होते. अखेर या पुरस्कारावर ‘एंडलेस बॉर्डर्स’ ने नाव कोरले आहे.