आयआयटीयन्स बनले शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षक

136

आयआयटी संस्थांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळते हे सर्वज्ञात आहे. त्याच धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मिळावे यासाठीही आयआयटी संस्था सक्रिय असतात. पवई येथील आयआयटी मुंबईतील एनएसएसचे विद्यार्थी हीच सामाजिक बांधिलकी जपत एक लाखापेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षक बनले आहेत. आयआयटी मुंबईतील एनएसएसच्या माध्यमातून ओपन लर्निंग इनिशिएटिव्ह (ओएलआय) हे यूटय़ूब चॅनेल चालवले जाते. त्याचा आतापर्यंत एक लाखावर विद्यार्थी लाभ घेत आहेत. या चॅनेलवर विविध नऊ प्रादेशिक भाषांमधून व्हिडीओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आयआयटी मुंबईतील एनएसएसचा विद्यार्थी यश संघवी याच्या कल्पनेतून 2015 मध्ये या चॅनेलची सुरुवात झाली. त्याद्वारे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाते. गणित आणि विज्ञान विषयांसंदर्भातील 300 हून अधिक व्हिडीओ या चॅनेलवर उपलब्ध आहेत. मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगू, मल्याळम, तामीळ, ओडिया आणि बंगाली या भाषांमधून हे व्हिडीओ आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या