
पवई येथील आयआयटी मुंबईचा ‘टेकफेस्ट’ महोत्सव हा आता मुंबईकरांना महोत्सव बनला आहे. आयआयटीतील विद्यार्थ्यांकडून आयोजित केल्या जाणाऱया या महोत्सवासाठी मुंबईकरांनाही खुले निमंत्रण देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कलाकारांचे कार्यक्रम पाहण्यास हजारो रुपये तिकिटांसाठी खर्च करावे लागतात. ते कार्यक्रम मुंबईकरांना टेकफेस्टमध्ये विनामूल्य पाहता येणार आहेत.
टेकफेस्टमध्ये 5 जानेवारीची रात्र ‘टेक्नोहोलिक्स’ या कार्यक्रमाने रंगणार आहे. त्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांचे कॉन्सर्ट होणार आहेत. ईडीएम नाईटस्, लेझर शो, यूव्ही लाईट शो, ट्रॉन डान्सेस, ऍक्रोबॅटिक्सचा त्यात समावेश असणार आहे. उपस्थित हजारो दर्शकांसाठी व्हर्च्युअल थ्रीडी होलोग्राफीक डिस्प्ले हे प्रमुख आकर्षण असणार आहे. जगातील सर्वोत्कृष्ट डीजे म्हणून ख्याती असलेला इंग्लंडचा डीजे अफिशाल याचा शो टेक्नोहोलिक्समध्ये होणार आहे. या कार्यक्रमाच्या विनामूल्य पासेससाठी www.techfest.org/technoholix या वेबसाईट लिंकवर नोंदणी करावी.























































