
मुंबईतील 80 व्या मजल्यापर्यंतच्या उत्तुंग इमारतींमध्ये आगीसारख्या दुर्घटनांमध्ये बचावकार्य करण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन बनवण्यासाठी पाच स्टार्टअप पंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. ‘आयआयटी’ने सुचवलेल्या तंत्रज्ञानानुसार हा ड्रोन बनवण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त उंचीवर जाऊन दुर्घटना ठिकाणची छायाचित्रे पाठवणे, पाण्याचा फवारा मारून आग विझवणे अशी कामे अपेक्षित आहेत.
मुंबईत घडणाऱ्या सर्व प्रकारच्या दुर्घटनांमध्ये पालिकेचे अग्निशमन दल आघाडीवर असते. त्यामुळे अग्निशमन दलाची क्षमता वाढवून अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येत आहे. झपाटय़ाने औद्योगिक आणि नागरी विकास होणाऱ्या मुंबईत सध्या 250 ते 300 मीटर उंचीच्या टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे अग्निशमन दलासमोरील आव्हाने वाढत आहेत. उत्तुंग इमारतीमध्ये आग विझवणारी स्वयंचलित यंत्रणा ठप्प असल्यास जीवित आणि वित्तहानी वाढण्याचा धोका असतो. पालिकेकडे सध्या 90 मीटरपर्यंत उंच म्हणजे 30 व्या मजल्यापर्यंत जाणारी शिडी आहे. मात्र त्यावरील आगी विझवताना पाणी पोहोचवण्यात प्रचंड अडचणी येतात. त्यामुळे पालिकेने आगीसारख्या दुर्घटनांमध्ये बचावकार्यासाठी ड्रोन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी आहेत आव्हाने
दुर्घटनेची केवळ पाहणी करण्यासाठी छोटा ड्रोन उपयुक्त ठरू शकतो. मात्र या ड्रोनमध्ये पाणी घेऊन जाण्याची क्षमता असणे अपेक्षित आहे. शिवाय दुर्घटनेची स्थिती कळवणे, पह्टो पाठवणे, मेसेज देणे अपेक्षित आहे. या सर्व गोष्टी एकाच ड्रोनमध्ये असण्यासाठी पालिकेला सक्षम पुरठादार मिळणे आव्हान ठरत आहे. त्यामुळे स्टार्टअप पंपन्यांच्या प्रतिसादाकडे अग्निशमन दलाचे लक्ष लागले आहे.
असा होणार फायदा
- आग लागलेल्या ठिकाणी जवान पोहोचू न शकणाऱ्या ठिकाणी ड्रोन पोहोचून पह्टो पाठवणार, बचावकार्य करणार.
- दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचून अग्निशमन दलाचे मेसेज अडकलेल्यांकडे पोहोचून धीर देता येणार आहे.
- आगीच्या दुर्घटनेसह समुद्रात बचावकार्य करण्यासाठीही या ड्रोनचा वापर करता येणार आहे.
- दाटीवाटीच्या मुंबईत शिडी, बंब पोहोचू न शकणाऱ्या ठिकाणांसाठी ड्रोन उपयुक्त ठरणार.




























































