अवैध चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकवर 1 लाख 46 हजार 800 रूपये रकमेची दंडात्मक कारवाई

देवगड तहसीलदारांनी अवैध चिरे व वाळू वाहतुक करणाऱ्यांवर धडक कारवाई मोहीम राबवली असून सोमवारी अवैध चिरे वाहतुक करणाऱ्या ट्रकवर लिंगडाळ तिठा येथे कारवाई करून 1 लाख 46 हजार 800 रूपये रकमेचा दंड ठोठावला आहे.

देवगड तहसिलदार रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे मंडल अधीकारी व वळीवंडे; तलाठी यांनी सोमवारी सायंकाळी 4 वा.सुमारास लिंगडाळ तिठा येथे अवैध चिरे वाहतुक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. हा ट्रक देवगड तहसील कार्यालय परीसरात आणण्यात आला असून ट्रकवर सुमारे 1 लाख 46 हजार 800 रूपये रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.