
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने चिपळूण तालुक्यामध्ये लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहिमेअंतर्गत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक आणि विक्री केंद्रावर छापे टाकून 1 लाख 28 हजाराची दारू पकडली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने एकूण तीन गुन्हे नोंदवून 1,28,796 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. श्रीकांत लक्ष्मण शिवगण (रा. पिंपळीखुर्द, सुतारवाडी, ता.चिपळूण), निलेश दत्ताराम भुवड ,एकनाथ दत्ताराम साळवी (दोघे रा.कोळकेवाडी, जोशीवाडी, ता.चिपळूण) या तीन जणांविरोधात दारुबंदी गुन्ह्यातंर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून एका दुचाकीसह मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा, देशी दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. रकारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव, प्रभारी निरीक्षक सुरेश पाटील, जवान विशाल विचारे, सागर पवार, महादेव चौरे ,अर्शद शेख यांनी ही कारवाई केली.




























































