बेकायदा सावकारी करणाऱ्या सराफाला अटक; खंडणी विरोधी पथक दोनची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेकायदा सावकारी करणाऱ्या सराफाला खंडणी विरोधी पथक दोनने सिंहगड परिसरात अटक केली. त्याने तक्रारदाराने साडेतीन लाख रुपयांची मूळ रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही तब्बल 7 लाखाच्या व्याजाची मागणी केली होती. सराफ प्रशांत सुरेश तोलगेकर (रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत एकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दिला होता.

तक्रारदाराला कौटुंबिक कारणासाठी पैशांची गरज असल्यामुळे त्यांनी प्रशांत यांच्याकडून साडेतीन लाख रुपये व्याजाने घेतले. त्याबदल्यात तक्रारदाराची मोटार आणि घराची कागदपत्रे तोलगेकरने गहाण ठेवली. काही दिवसांनी तक्रारदाराने तोलगेकरला मुद्दल आणि 87 हजारांचे व्याज दिले. त्याशिवाय व्याजापोटी आणखी चार लाख रूपये देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, सराफाने तक्रारदाराकडे सात लाख रुपयांची मागणी केली.

बेकायदा सावकारी करणाऱ्या सराफाविरूद्ध तक्रारदाराने गुन्हे शाखेकडे अर्ज दाखल केला. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने तोलगेकर याला अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, एपीआय चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, विजय गुरव, सचिन अहिवळे, अमोल पिलाणे, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, चेतन आपटे, चेतन शिरोळकर किशोर बर्गे, सैदोबा भोजराव, आशा कोळेकर, रूपाली कर्णवर यांनी केली.