
राज्यात सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहेत. येत्या पाच दिवसांत अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस बरसेल, असा अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या चक्राकार वारे राजस्थान, मध्य प्रदेशात सक्रीय आहेत. 3, 4 आणि 5 मे रोजी विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडेल.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
3 मे : नाशिक, अमरावती, यवतमाळ ,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीत येलो अलर्ट.
पुणे, अहिल्यानगर ,धुळे, नंदुरबार ,नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात हलक्या पावसाचा इशारा.
4 मे : नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीत येलो अलर्ट
मुंबई, ठाणे ,रायगड ,पुणे ,सातारा, बीड ,जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हांमध्ये पावसाची शक्यता.
5 मे : संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा.
6 मे : सातारा, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उर्वरित ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज.
7 मे : संपूर्ण कोकणपट्टा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व बहुतांश मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा.
3 May, आयएमडीच्या मॉडेल मार्गदर्शनानुसार, पुढील ४८ तासांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असू शकते, जसे येथे दाखवले आहे.
दिवस ३, ४ नंतर तापमानात हळूहळू घट होऊ शकते ज्यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात आराम मिळेल. pic.twitter.com/dOwUWCEYgV— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 3, 2025
सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाने हाहाःकार माजवला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. दिल्लीतही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.