जगभरातील महत्वाच्या बातम्या

तैवानमध्ये भूपंपाचे धक्के

तैवानमध्ये मोठा भूकंप झाला. सहा तासांत भूपंपाचे 80 धक्के जाणवले. यामध्ये सर्वाधिक 6.3 आणि 6 तीव्रतेची नोंद झाली. भूपंपाचा पेंद्रबिंदू पूर्वेकडील हुआलियन प्रांतात जमिनीपासून 5.5 किलोमीटर खाली होता.

आणखी एका  विद्यार्थ्याचा मृत्यू

किर्गीजस्थानात एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याचा किर्गीजस्थानात मृत्यू झाला. दसारी चंदू (20) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो आंध्र प्रदेशातील अनकापल्लीचा रहिवासी आहे.

बापाचा अतिरेकी प्रयोग मुलावर बेतला

रशियन इन्फ्लुएन्सर मॅक्झिम ल्युटी याच्या हट्टापायी त्याच्या बाळाचा मृत्यू झाला. त्याने बाळाला उन्हात ठेवण्याचा प्रयोग सुरू केला. हा प्रयोग मुलाच्या जिवावर बेतला. याप्रकरणी मॅक्झिम ल्युटीला आठ वर्षांची शिक्षा झाली आहे.

पाक दहशतवाद्यांकडे अमेरिकन शस्त्र

जम्मू-कश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या टार्गेट किलिंगमध्ये अमेरिकन रायफलचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दहशतवाद्यांनी सोमवारी राजौरीमध्ये मोहम्मद रज्जाक नावाच्या सरकारी कर्मचाऱयाची गोळ्या झाडून हत्या केली होती.

रक्तातून कॅन्सरचे निदान

आर्टिफिशल इंटेलिजन्सवर (एआय) आधारित तंत्रज्ञान कॅन्सर रुग्णांसाठी वरदान ठरताना दिसत आहे. एआय आधारित टेस्टमध्ये फक्त सुकलेल्या रक्ताचा एक थेंब वापरून कॅन्सरचे अचूक निदान करता येईल, असा यशस्वी प्रयोग चीनच्या संशोधकांनी केला. चीनच्या शास्त्रज्ञांनी नेचर सस्टेनेबिलिटी जर्नलमध्ये सोमवारी आपले संशोधन प्रकाशित केले. गरीब देशांसाठी नवे संशोधन वरदान ठरेल, असा विश्वास संशोधकांना आहे.

मुइझ्झू संविधान बदलणार

मालदीवमधील संसदीय निवडणुकीत हिंदुस्थानविरोधी मताचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांना प्रचंड बहुमत मिळाले आहे. या विजयानंतर मुइझ्झू यांनी चीनच्या अजेंडय़ावर काम करायला सुरुवात केली असून ते लवकरच संविधान बदलण्याचे काम करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. सध्या राष्ट्रपतींच्या अधिकारांवर संसदेचे नियंत्रण आहे. मुइझूंच्या पक्षाने निवडणूक प्रचारादरम्यान हिंदुस्थान विरोधी भूमिका स्वीकारली होती. मुइझ्झू यांनी हिंदुस्थानी सैनिकांच्या दुसऱया आणि शेवटच्या तुकडीला 10 मेपर्यंत मालदीव सोडण्याचा अल्टिमेटम दिला आहे.