महत्त्वाच्या बातम्या – के-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, आता समुद्रातूनही अण्वस्त्रांचा मारा शक्य

के-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, आता समुद्रातूनही अण्वस्त्रांचा मारा शक्य

विशाखापट्टणम हिंदुस्थानने बंगालच्या उपसागरात आयएनएस अरिघात या आण्विक पाणबुडीतून के-4 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. 3,500 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्रातून अण्वस्त्रांचाही मारा करता येतो. विशाखापट्टणमच्या समुद्र किनाऱयाजवळ ही चाचणी झाली. त्यामुळे आता समुद्राच्या आतमधून अण्वस्त्रांचा मारा करण्याचे सामर्थ्य हिंदुस्थानला प्राप्त झाले आहे. या क्षेपणास्त्रातून 2 टन वजनापर्यंतची अण्वस्त्रs नेता येतात. अरिहंत क्लास पाणबुडय़ांमधून या क्षेपणास्त्रांचा मारा करता येतो. विशेष म्हणजे, शत्रूंच्या रडारला चकविण्याची त्याची क्षमता असून अतिशय वेगाने ते लक्ष्याचा अचूक वेध घेते.

भायखळा शाखा समन्वयक जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भायखळा विधानसभा क्षेत्रातील शाखा क्र. 209च्या शाखा समन्वयकपदी प्रदीप बागवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

10व्या मजल्यावरून पडले, 8व्या मजल्यावर अटकले आणि वाचले

गुजरातच्या सुरत शहरात एका बहुमजली इमारतीतून अर्धवट झोपेत चक्कर आल्यामुळे एक जण 10व्या मजल्यावरून खाली पडला. दैव बदवत्तर म्हणून त्याचा पाय आठव्या मजल्यावरील सुरक्षा ग्रिलमध्ये अडकला आणि त्याचे प्राण वाचले. नितीन भाई (57) असे त्यांचे नाव आहे. ते बुधवारी रात्री खिडकीजवळ झोपले होते. सकाळी उठल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि ते खिडकीतून पडले. आठव्या मजल्यावर पाय अडकल्यामुळे ते उलटे लटकले. तेथे राहणाऱयांनी त्यांना तसेच धरून ठेवले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना वाचविण्यात आले.

ठाण्यात शिवसैनिक आणि मनसैनिकांची भव्य रॅली!

शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, ठाणेपालघर मनसे अध्यक्ष अविनाश जाधव, जिल्हाप्रमुख केदार दिघे, लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, शहरप्रमुख अनिश गाढवे, मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, मनसेच्या समीक्षा मार्कंडे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे यांनी टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.