1.74 लाख कोटींचे जीएसटी कलेक्शन
ऑगस्ट महिन्यात जीएसटी कलेक्शन तब्बल 1,74,962 कोटी रुपयांचे झाले आहे. या कलेक्शनमध्ये सीजीएसटी 39,586 कोटी आणि एसजीएसटी 33,548 कोटी रुपये आहे. जीएसटी कलेक्शनमुळे सरकारी खजाना 10 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये जीएसटी कलेक्शन 1.59 लाख कोटी रुपये झाले होते. तर जुलै महिन्यात जीएसटी कलेक्शन 1.82 लाख कोटी रुपये झाले होते. ऑगस्ट 2024 च्या देशांतर्गत मिळकत 9.2 टक्के वाढून 1.25 लाख कोटी रुपये झाले आहे. वस्तू आयातीतून जीएसटी रिव्हेन्यू 12.1 टक्के वाढून 49,976 कोटी रुपये झाला आहे. याआधी जून मध्ये 1.74 लाख कोटी आणि जुलैमध्ये 1.82 लाख कोटी रुपये सरकारी खजान्यात जमा झाले होते.
युक्रेनचा 150 ड्रोनने रशियावर हल्ला
युक्रेनने आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला रशियावर केला. यावेळी युक्रेनने 150 हून अधिक ड्रोनने हल्ला करत रशियाच्या मॉस्कोच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य केले. तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ल्यानंतर स्पह्ट झाला. यानंतर धुराचे लोट उठताना दिसत होते.
रशियन गुप्तहेर ‘ह्वाल्दिमिर’चा मृत्यू
रशियन गुप्तहेर समजल्या जाणाऱया व्हाईट बेलुगा व्हेल ‘ह्वाल्दिमिर’चा मृत्यू झाला आहे. नॉर्वेच्या रिसाविका खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या पिता-पुत्रांना या व्हेलचा मृतदेह तरंगताना दिसला. 14 फूट लांब व्हेलचे वय जवळपास 15 वर्षे होते, तर वजन 1225 किलो होते.
चांदी घसरली, सोनेही स्वस्त
सोने आणि चांदीच्या दरात सोमवारी घसरण झाली. चांदी 2 हजार 643 रुपयांनी घसरून प्रति किलो 82 हजार 376 रुपयांवर पोहोचली. तर सोन्याच्या किंमती सुद्धा घसरल्या. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 521 रुपयांनी घसरून 71 हजार 437 रुपयांवर पोहोचला. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 850 रुपयांवर पोहोचला.