माझ्या पत्नीवर विषप्रयोग केला जातोय, इम्रान खान यांचा आरोप

तुरुंगात कैद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी पाकिस्तानी लष्करावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी दावा केला आहे की त्यांची पत्नी बुशरा बीबी वर विषप्रयोग केला जात असून त्यांना जर काही झाले तर त्यासाठी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जबाबदार असतील. इम्रान खान यांच्या इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा यांना भेटवस्तू (तोशाखाना) भ्रष्टाचार प्रकरणी ठोठावलेली 14 वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगित केली. या दोघांना जामीनही मंजूर झाला असला तरी अन्य काही खटल्यांमधून दोषमुक्त होईपर्यंत त्यांची तुरुंगातून इतक्यात मुक्तता होणे सध्या अशक्य आहे.

उत्तरदायित्व न्यायालयाने 31 जानेवारी रोजी इम्रान आणि बुशरा या दोघांनाही प्रत्येकी 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. याचबरोबर, खान आणि बुशरा यांना 10 वर्षे कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास मनाई करत प्रत्येकी 787 दशलक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. इम्रान आणि बुशरा यांनी या शिक्षेला दिलेल्या आव्हानावर ईदनंतर हायकोर्ट सुनावणी घेणार आहे.