
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची माजी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ हिने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मालक एलॉन मस्क यांना जाहीर आवाहन केले आहे. इम्रान खान यांच्याशी संबंधित केलेल्या पोस्ट ‘एक्स’वर लपविण्यात येत आहेत. याबाबत दखल घेऊन मस्क यांनी त्रुटी दुरुस्त करावी, असे आवाहन गोल्डस्मिथ हिने केले आहे. गोल्डस्मिथ आणि तिच्या मुलांना इम्रान खान यांची भेट नाकारण्यात आली असून देशात पाय जरी ठेवला तरी तत्काळ मुलांसह अटक करण्याची धमकी दिल्याचे गोल्डस्मिथ यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात ठेवण्यात आले आहे. खान हे मानवाधिकार नाकारलेले एक राजकीय पैदी असल्याचे सत्य जगापुढे मांडण्यासाठी ‘एक्स’ हे एकमेव व्यासपीठ आहे, मात्र तरीही माझ्या पोस्ट जनतेपर्यंत पोहोचण्यापासून जाणूनबुजून रोखण्यात येत असल्याचे गोल्डस्मिथ यांनी म्हटले आहे.































































