
जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा खेळ आहे. जन्माला आला तो कधी ना कधी जाणार आहे. 2025 मध्ये देखील अनेक लाडक्या कलाकारांनी कायमची एग्झिट घेतली. असे असले तरी, हे सर्व कलाकार आपल्या कायम चिरस्मरणात राहतील. कलेचा बहुमोली वारसा हे कलाकार आपल्यासाठी सोडून गेले आहेत. त्यामुळे ते सदैव रसिकांच्या मनात अमर राहतील.
धर्मेंद्र

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. बाॅलीवूडमध्ये त्यांना हिमॅन या नावाने ओळखले जात असे. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. पवनहंस जुहू येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोवर्धन असरानी

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते आणि विनोदी कलाकार गोवर्धन असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, विनोदी ते पात्र अभिनयापर्यंतच्या भूमिकांमध्ये त्यांनी आपली बहुमुखी प्रतिमा दाखवली.
कामिनी कौशल

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत होत्या. त्यांनी मोठ्या पडद्यावर अनेक प्रसिद्ध भूमिका केल्या. शहीद, दो रास्ते आणि प्रेम नगर सारख्या चित्रपटांसाठी त्यांना खूप पसंती मिळाली. सहाय्यक भूमिकांमध्येही त्यांनी चाहत्यांची मने जिंकली.
शेफाली जरीवाला

काँटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे कार्डियेक अरेस्टने अवघ्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. शेफाली अनेक म्युझिक व्हिडीओज, रिऑलिटी शोज आणि चित्रपटांत झळकली होती. 2002 मध्ये ‘काँटा लगा’ या गाण्यामुळे शेफाली रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. 1964 सालच्या ‘समझौता’ या चित्रपटातील ‘काँटा लगा’ या गाण्याचे हे रीक्रिएटेड व्हर्जन होते. पुढे ती नच बलिए 5, 7, ‘बिग बॉस 13’ या रिऑलिटी शोमध्ये झळकली. 2018 मध्ये ‘बेबी कम ऑन’ वेब सीरिजमध्ये ती श्रेयस तळपदेसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.
पंकज धीर

अभिनेते पंकज धीर यांनी वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज यांना कर्करोग होता, त्यावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली होती. मात्र मागच्या काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कॅन्सरचे निदान झाले. पंकज यांनी टिव्ही इंडस्ट्रीत एकापेक्षा एक सरस प्रोजक्ट केले आहेत. मात्र बी.आऱ चोपडा यांची ‘महाभारत’ मालिका त्यांच्यासाठी टर्निंग पॉईण्ट ठरली होती. या मालिकेत त्यांनी कर्णाची भूमिका ज्या पद्धतीने वठवली होती, ती आजही प्रेक्षकांच्या चिरस्मरणात आहे.
सतिश शहा

ज्येष्ठ अभिनेते सतिश शाह यांच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूड हळहळले. सतिश शहा यांना किडणीचा आजार होता. त्यांचे किडणीच्या आजारांवरील उपचार झाले होते. दुर्देवाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. सतीश शाह यांना साराभाई व्हर्सेस साराभाई या टीव्ही शोमुळे प्रसिद्धी मिळाली. त्यांनी मैं हूं ना , कल हो ना हो , फना आणि ओम शांती ओम यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे.


























































