चेंबूर येथील डी डी ए इ चषक क्रिकेट स्पर्धेत अजंठा -रामेश्वरम यांच्यात अंतिम लढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूर येथे सुरू असलेल्या 37 व्या डीडीएई चषक क्रिकेट स्पर्धेत गतविजेता अजंठा-रामेश्वरम यांच्यात जेतेपदासाठी लढत रंगेल. ट्रॉम्बे येथील चेतेश्वर मैदानात झालेल्या  उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात रामेश्वरमने (चेन्नई) गोलकाsंडाचा (हैदराबाद) 76 धावांनी दणदणीत पराभव केला. रामेश्वरमने 25 षटकांत 8बाद 142 धावा केल्या होत्या तर गोलकाsंडाचा डाव 66 धावांतच कोसळला.

दुसऱया उपांत्य सामन्यात गतविजेता अजंठा संघाने चुरशीच्या लढतीत द्वारकाचा 10 धावांनी पराभव केला. अजंठाकडून उमेश बोंद्रे (66), सागर कावंडकर (46) यांच्या दमदार फलंदाजीमुळे त्यांनी 25 षटकांत 8 बाद 157 धावांची मोठी मजल मारली. द्वारका संघाला 25 षटकांत 8 बाद 147 धावांची मजल मारता आली.