
जर्मनीत अनेक जागतिक दर्जाची विद्यापीठे आहेत. त्यात शुल्कही नगण्य आहे. अनेक विद्यापीठे जगातील टॉप-१०० विद्यापीठांच्या यादीत समाविष्ट आहेत. अभ्यासाच्या दृष्टीने हिंदुस्थानी विद्यार्थ्यांसाठी जर्मनी “एज्युकेशन सेंटर’च्या रूपात काम करत आहेत. विदेश मंत्रालयानुसार, जर्मनीत सध्या २१ हजार विद्यार्थी शिकत आहेत. येथे ३०० विद्यापीठे आहेत.त्यात १००० हून जास्त कोर्सेस आहेत.विद्यार्थ्यांना केवळ प्रवास भाडे आणि प्रशासनाचे किरकोळ शुल्क द्यावे लागते. ही रक्कम सेमिस्टर शुल्काच्या रूपात जमा होते. ही १३ हजार ते २६ हजार रुपयांदरम्यान असते. ही रक्कम अमेरिका आणि ब्रिटनच्या विद्यापीठांच्या तुलनेत खूप कमी आहे. डार्म्सटॅटच्या टेक्निकल विद्यापीठातील विद्यार्थी अक्षय म्हणाला की, आपल्या आवडीचे कॉलेज शोधणे आणि अर्ज करणे खूप सोपे आहे.भारतीय विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्त्या आहेत. यासोबत हिंदुस्थानी बँकाही कमी व्याजदरावर विद्यार्थी कर्ज देतात. येथे निवास, भोजन आणि आरोग्य विम्याचा खर्च ८०० युरो म्हणजे, ७० हजारांपेक्षाही कमी होतो. विद्यार्थ्यांना यासाठी घरच्यांवर अवलंबून राहावे लागत नाही. विद्यार्थीनी यामी म्हणते की, येथे विद्यार्थ्यांना अर्धवेळ नोकरी केल्यावर ताशी १५ युरो मिळतात. विद्यार्थी अक्षय म्हणाला, येथे सेमिस्टर्सदरम्यान ब्रेकही घेतला जाऊ शकतो. यासोबत एखाद्या विद्यार्थ्यास एखाद्या कोर्समध्ये ब्रेक घेऊन दुसरा कोर्सही करू शकतो.
जर्मनीत शॉपिंग मॉल, जिम आणि सार्वजनिक वाहतुकीत विद्यार्थ्यांना सूट दिली जाते. यामुळे विद्यार्थी पैशाची बचत करू शकतात. मात्र, विद्यार्थ्यांना येथे आवश्यक रूपात विमाही काढावा लागतो. यासाठी दरमहा ११० युरो भरावे लागतात.


























































