सिटी ग्रुपच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाचा छापा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून प्राप्तीकर विभागाने बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्या सिटी गुपच्या कार्यालयावर बुधवारी छापा टाकला. प्राप्तीकर विभागाने शहरात एकाचवेळी सहा ठिकाणी छापे टाकले. कारवाईत काही कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साधने जप्त केली आहेत. देशपांडे यांची सिटी कॉर्पेरेशन लिमिटेड नावाने बांधकाम कंपनी असून, संबंधित कार्यालय फर्ग्युसन रस्त्यावर आहे. तर, हडपसर भागातील अमनोरा पार्क परिसरातही कार्यालय आहे. पथकाने दोन्ही कार्यालये आणि निवासस्थानातून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. कारवाईत प्राप्तीकर विभागाच्या दिल्ली आणि मुंबईतील अधिकाऱ्यांचे पथक सहभागी झाले होते. दरम्यान, रायगडमधील रोहा येथे केळदवाडीतील फार्महाऊसवरही अधिकाऱ्यांनी झडती घेतली.