आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा कौशल्य विकास अभ्यासक्रमात समावेश, विद्यार्थ्यांना काळानुरूप शिक्षणाच्या संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या 196 शाळांमध्ये 294 कौशल्य विकास पेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायाभिमुख शिक्षण घेता येईल. त्याशिवाय राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींमधील 500 गावांमध्ये काwशल्य विकास पेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या विषयाचा समावेश करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या 196 माध्यमिक शाळांमध्ये मिळून 294 काwशल्य विकास पेंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचा पथदर्शी प्रकल्प ग्रँट रोड येथील जगन्नाथ शंकरशेट नाना चौक माध्यमिक शाळेत उभारण्यात आला असून याचे लोकार्पण राज्याचे कौशल्य विकासमंत्री  मंगलप्रभात लोढा, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले

 व्यावसायिकाभिमुख शिक्षण

यामध्ये 10 अभ्यासक्रम शिकविले जातील. धोरणाचा एक भाग म्हणून नवीन शैक्षणिक धोरणअंतर्गत सरकारी माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य विकास पेंद्र उभारण्यात येणार आहे.

यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, फॅशन डिझायनिंग, फिल्ड टेक्निशियन्स (होम अप्लायन्सेस), फिल्ड टेक्निशियन्स (ए.सी.), रोबोटिक्स, प्लंबिंग, फूड अॅण्ड बेव्हरजेस सर्व्हिस असिस्टंट, स्टोअर ऑपरेशन असिस्टेंट, मल्टिस्किल टेक्निशियन असिस्टंट आणि मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट/ जनरल डय़ुटी असिस्टंट आदी दहा अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.