दमदार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्याची वरदानी असलेल्या उजनी धरण  पाणलोट क्षेत्रात  झालेल्या दमदार पावसामुळे  उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.  उजनी धरणातून गुरुवारी रात्री 2 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू होता. यामध्ये वाढ करत आज सकाळी उजनी धरणाच्या 42 पैकी 16 दरवाज्यांतून 40 हजारांपर्यंत विसर्ग  वाढवण्यात  आला आहे,

 तर उजनीतून कालवा 2000 क्युसेक, बोगदा 800 क्युसेक, सिना-माढा उपसा सिंचन योजना 259 क्युसेक, वीजनिर्मितीसाठी 1600 क्युसेक, कारंबा उपसा सिंचन 84 क्युसेक अशाप्रकारे उजनी धरणावरील सर्व योजनांद्वारे पाणी सोडण्यात येत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून धरण प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तातडीच्या उपाय योजना म्हणून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरण 102 टक्के भरले आहे गेल्या दोन दिवसात उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरलेली असून  पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू पाऊस सुरू आहे. त्यामुळे उजनीत बंडगार्डन व दौंड येथुन येणार्‍या विसर्गात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे उजनी प्रशासनाने खबरदारी म्हणून उजनीतून भीमा नदीला पाणी सोडण्यात आले आहे.

 उजनी धरणातील पाणीपातळी

  • एकूण पाणीपातळी –  496.969 मीटर
  • एकूण पाणीसाठा  –  3363.92  दलघमी
  • एकूण पाणीसाठा  –  118.78 टीएमसी
  • उपयुक्त  साठा   -1561.18    दलघमी
  • उपयुक्त  साठा   –  55.12  टीएमसी
  • टक्केवारी   102.89    –    टक्के

आवक

  • दौंड विसर्ग      – 55224 क्यूसेक
  • बंडगार्डन       –  26021  क्यूसेक

विसर्ग 

कालवा – 2000 क्युसेक

बोगदा  – 800 क्युसेक

सिना-माढा उपसा सिंचन – 259 क्युसेक

दहीगाव उपसा सिंचन – 43 क्युसेक

वीज निर्मिती – 1,600 क्युसेक

भीमा नदी पात्रात  विसर्ग – 40, 000 क्युसेक