13 ऑक्टोबरपर्यंत आयसीयू बेड आणि ऑक्सिजन सुविधा वाढवा, केंद्रीय आरोग्य विभागाची महाराष्ट्राला सूचना

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील महिन्याच्या 13 ऑक्टोबरपर्यंत रुग्ण वाढीच्या संख्येचा अंदाज घेऊन राज्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, आयसीयू व व्हेटिलेटरचे 7 हजार 355 बेडस् वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला अहवाल पाठवला आहे. त्यानुसार 13  सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात सुमारे 10 लाख  11  हजार 404 करोनाचे रुग्ण होते. तर 13 ऑक्टोबरला कोरोनाचे 16  लाख 96  हजार 991  रुग्ण असतील असा अंदाज वर्तवला आहे. रुग्ण वाढीच्या संख्येचा सखोल अभ्यास करून राज्यातील रुग्णालयांत ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग व व्हेंटिलटरचे 7 हजार 355 बेड वाढविण्याच्या स्पष्ट सूचना केंद्र सरकारने  दिल्या आहेत. पुढील महिन्यात वाढणारे रुग्ण लक्षात घेऊन पुरेशा बेडची व्यवस्था न केल्यास करोना रुग्णांचे बेडअभावी  हाल होतील तसेच मृत्यूंची संख्याही वाढेल अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे अतिदक्षता विभागात 4 हजार 385 बेड, 2  हजार 584 व्हेंटिलेटर बेड व 400 ऑक्सिजन बेड वाढविण्यास सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या