बंगाली वाघांची दीडशेत शिकार, ‘टीम इंडिया’च्या वेगवान गोलंदाजीपुढे पाहुण्यांची दाणादाण

549

‘टीम इंडिया’च्या वेगवान गोलंदाजीपुढे बांगलादेशच्या फलंदाजांनी पहिल्या डावात सपशेल लोटांगण घातले. मर्यादित षटकांतील क्रिकेटमध्ये शेर म्हणून ओळखला जाणारा बांगलादेशचा संघ दीडशे धावांत ढेर झाला. नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजीचा घेतलेला निर्णय पाहुण्यांसाठी आत्मघातकी ठरली. हिंदुस्थानी गोलंदाजांनी पहिल्या क्रिकेट सामन्यात अवघ्या 58.3 षटकांत बांगलादेशची केवळ 150 धावांत शिकार केली. प्रत्युत्तरादाखल उर्वरित 26 षटकांच्या खेळात ‘टीम इंडिया’ने पहिल्या डावात 1 बाद 86 धावसंख्येपर्यंत मजल मारली. रोहित शर्मा 6 धावांवर बाद झाला. अबू जायेदने यष्टीमागे लिटन दासने त्याचा झेल टिपला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मयांक अग्रवाल 37, तर चेतेश्वर पुजारा 43 धावांवर खेळत होते.

सलामीची जोडी अपयशी

हिंदुस्थानच्या वेगवान माऱयापुढे बांगलादेशची सलामीची जोडी अपयशी ठरली. उमेश यादवने सहाव्या इमरुल कायेसला (6) रहाणेकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले. पुढच्याच षटकात इशांत शर्माने शादमान इस्लामला यष्टीमागे साहाकरवी झेलबाद करून बांगलादेशला दुसरा धक्का दिला.

अश्विनची हरभजन व कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी

मोमिनुलमुश्फिकुरची झुंज

उपाहारापर्यंत बांगलादेशचे तीन फलंदाज बाद झाले होते. मोहम्मद शमीने मोहम्मद मिथूनला (13) पायचित पकडून पाहुण्यांची अवस्था 18 षटकांत 3 बाद 31 अशी केली, मात्र त्यानंतर कर्णधार मोमिनुल हक (37) व मुश्फिकर रहीम (43) यांनी काही वेळ हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार केला. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी 68 धावांची भागीदारी केली. रविचंद्रन अश्विनने मोमिनुलला मामा बनवत त्याचा त्रिफळा उडविला. चेंडू खेळू की सोडू या द्विधा मनःस्थितीत आपला ऑफ स्टंप कधी उडाला हे मोमिनुलला कळलेही नाही. मग अश्विनने आलेल्या महमूदुल्लाहचेही (10) दांडके उडवून बांगलादेशला पाचवा धक्का दिला. मोहम्मद शम्मीने स्थिरावलेल्या मुश्फिकुरचा त्रिफळा उडवून त्याला अर्धशतकापासून वंचित ठेवले. त्यानंतर आलेल्या लिटन दासने 21 धावांची खेळी केली, तर तळाचे फलंदाज केवळ हजेरीवीर ठरले. हिंदुस्थानकडून वेगवान मोहम्मद शमीने 3, तर इशांत शर्मा, उमेश यादव व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले.

अश्विनने केली मुरलीधरनची बरोबरी

फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने मोमिनूल हकचा त्रिफळा उडवून मायदेशातील 250 वा कसोटी बळी टिपला. याचबरोबर घरच्या मैदानावर वेगवान अडीचशे बळी टिपणारा तो हिंदुस्थानी गोलंदाज ठरला. अनिल कुंबळेने 43 कसोटींत 250 बळींचा टप्पा गाठला होता. अश्विनने 42 कसोटींतच हा पराक्रम करून कुंबळेचा विक्रम मोडला. याचबरोबर श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाची बरोबरी केली. मुरलीधरननेही 42व्या कसोटीतच घरच्या मैदानावर 250 बळींचा आकडा गाठला होता.

हिंदुस्थानने सोडले पाच झेल

हिंदुस्थानने पाच झेल सोडले नसते  तर बांगलादेशला पहिल्या डावात शंभरीही पार करता आली नसती. मात्र पाहुण्यांना या जीवदानाचा फायदा उठविता आला नाही अन् त्यांचा डाव दीडशेतच संपला. यात कर्णधार विराट कोहलीने एक झेल सोडला. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने तब्बल तीन झेल सोडले. एक झेल रहाणे व यष्टिरक्षक रिद्धिमान साहा यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे सुटला.

रोहित नाबाद 350!

हिंदुस्थानचा धडाकेबाज सलामीकीर रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला असला तरी याने एक महत्त्काचा पराक्रम केला. आजचा कसोटी सामना हा रोहितचा 350 का आंतरराष्ट्रीय सामना ठरला. रोहित कसोटी कारकीर्दीतील 31 का सामना खेळला. या आधी रोहितने टीम इंडियासाठी 218 एकदिकसीय आणि 101 टी-20 सामने खेळले आहेत. रोहितने 350 सामन्यांचा टप्पा गाठला.

धावफलक –

बांगलादेश (पहिला डाव) – शादमान इस्लाम झे. साहा गो. इशांत 6, इमरूल कायेस झे. रहाणे गो. यादव 6, मोमिनूल हक त्रि. गो. अश्विन 37, मोहम्मद मिथुन पायचित गो. शमी 13, मुश्फिकुर रहीम त्रि. गो. शमी 43, महमूदुल्लाह त्रि. गो. अश्विन 10, लिटन दास झे. कोहली गो. इशांत 21, मेहीदी हसन पायचित गो. शमी 0, तैजुल इस्लाम धावबाद (जाडेजा/साहा) 1, अबू जायेद नाबाद 7, इबादत हुसैन त्रि. गो. यादव 2. अवांतर – 4. एकूण – 58.3 षटकांत 150 धावा.

बाद क्रम – 1-12, 2-12, 3-31, 4-99, 5-115, 6-140, 7-140, 8-140, 9-148, 10-150. गोलंदाजी ः इशांत शर्मा 12-6-20-2, उमेश यादव 14.3-3-47-2, मोहम्मद शमी 13-5-27-3, रविचंद्रन अश्विन 16-1-43-2.

हिंदुस्थान  (पहिला डाव) – 26 षटकांत 1 बाद 86.

आपली प्रतिक्रिया द्या