#INDvSA आफ्रिकेचे लोटांगण, टीम इंडिया ‘व्हाईटवॉश’पासून 2 विकेट्स दूर

4637

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत विजय मिळवण्यापासून टीम इंडिया फक्त दोन विकेट्स दूर आहे. तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेच्या 8 बाद 132 धावा झाल्या होत्या. सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी असल्याने हिंदुस्थान पाहुण्यांना व्हाईटवॉश देणार हे नक्की झाले आहे. चौथ्या दिवशी आफ्रिका पराभव किती वेळ लांबवतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

तत्पूर्वी तिसऱ्या दिवशी आफ्रिकेने आपला पहिला डाव 2 बाद 9 धावांवरून सुरू केला. तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना वेसन घालत झटपट बाद केले. हमजा (62) व्यतिरिक्त त्यांचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या रचू शकला नाही. टीम इंडियाने आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर गुंडाळत फॉलोऑन दिला. फॉलोऑननंतरही आफ्रिकेचा डाव कोसळला असून त्यांचे आठ फलंदाज तंबूत परतले आहेत.

लाईव्ह अपडेट –

 • आफ्रिकेचा  संघ अद्यापही 203 धावांनी पिछाडीवर
 • दिवसअखेर आफ्रिकेच्या 8 बाद 132 धावा
 • तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला

 • आफ्रिकेला आठवा धक्का, रबाडा 12 धावांवर बाद

 • अद्यापही 235 धावांनी पिछाडीवर
 • आफ्रिकेच्या 100 धावा पूर्ण
 • पीड्ट 23 धावांवर बाद
 • आफ्रिकेला सातवा धक्का

 • लिंडे 27 धावांवर रनआऊट
 • आफ्रिकेला सहावा धक्का

 • आफ्रिकेच्या 50 धावा पूर्ण
 • आफ्रिकेचे पाच खेळाडू 50 धावांमध्ये बाद

 • मोहम्मद शमी आणि उमेश यादवची घातक गोलंदाजी
 • आफ्रिकेचा दुसरा डाव कोसळला
 • आफ्रिकेला फॉलोऑन दिला
 • टीम इंडियाला 337 धावांची आघाडी
 • उमेश यादवने सर्वाधिक तीन, तर शमी, नदीम, जाडेजाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या
 • आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर आटोपला

 • आफ्रिकेला एकामागोमाग एक धक्के
 • तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू
 • खेळ थांबला तेव्हा आफ्रिकेच्या 2 बाद 9 धावा
 • अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवला
 • तीन षटकानंतर आफ्रिकेच्या दोन बाद 8 धावा
 • कूक चार धावांवर बाद, उमेश यादवने घेतला बळी
 • आफ्रिकेला दुसरा धक्का

 • आफ्रिकेला पहिला धक्का, एल्गार शून्यावर माघारी
 • आफ्रिकेचा डाव सुरू

 • टीम इंडियाचा पहिला डाव 497 धावांवर घोषित

आपली प्रतिक्रिया द्या