‘हिटमॅन’ रोहित शर्माचा भीमपराक्रम, जयसूर्याचा 22 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला

22989

कटकमध्ये निर्णायक लढतीमध्ये वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 315 धावा उभारल्या आणि टीम इंडियापुढे 316 धावांचे आव्हान ठेवले. विंडीजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल मैदानात उतरले. या दोघांनी 100 धावांची सलामी देत टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणून ठेवले. रोहित आणि राहुलने वैयक्तीक अर्धशतकही पूर्ण केले. या दरम्यान, रोहित शर्मा याने एक भीमपराक्रम केला आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याचा 22 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला.

मोहम्मद शमी ठरला ‘विकेट्स’चा बॉस; अनोख्या विक्रमासह कपिल देव, आगरकरला मागे सोडले

वेस्ट इंडीजने दिलेल्या आव्हानादाखल मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने नववी धाव घेताच त्याच्या नावावर एक मोठा विक्रम जमा झाला. एका कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक धावा (2442) चोपण्याचा विक्रम आता रोहितच्या नावावर जमा झाला. याआधी हा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या याच्या नावावर होता. जयसूर्याने 1997 ला सलामीला खेळताना क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये मिळून 2387 धावा चोपल्या होत्या.

2019 मध्ये सर्वाधिक धावा

रोहित शर्माने 2019 मध्ये एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. रोहितच्या नावावर 28 लढतींमध्ये 7 शतक आणि 6 अर्धशतकांसह 1475 पेक्षा जास्त धावांची नोंद झाली आहे. सध्या या यादीमध्ये वेस्ट इंडीजचा सलामीवीर फलंदाज शाई होप दुसऱ्या स्थानावर आहे. कटकमध्ये 42 धावांची खेळी करणाऱ्या होपच्या नावावर 28 लढतींमध्ये 4 शतक आणि 8 अर्धशतकांसह 1345 धावांची नोद आहे.

मोहम्मद शमी ठरला ‘विकेट्स’चा बॉस; अनोख्या विक्रमासह कपिल देव, आगरकरला मागे सोडले

विराटला संधी

तिसऱ्या स्थानावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली असून त्याच्या नावावर 26 लझतीत पाच शतक आणि सहा अर्धशतकांसह 1292 धावांची नोंद आहे. कटकमध्ये विराटला होपचा विक्रम मोडून दुसऱ्या स्थानावर येण्याची संधी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या