
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या तिसरा कसोटी सामना आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना ठस्सन देताना दिसत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सहा ते सात मिनिटांचा खेळ बाकी असताना जसप्रीत बुमराच्या षटकात जेक क्रॉलीने रडीचा डाव सुरू केल्याने शुभमन गिलची आणि त्याची बाचाबाच झाली. तसेच सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवच जॅक क्रॉलीला डिवचण्याचा प्रयत्न केला. आता या सर्व घटनेवर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भाष्य केलं असून त्यांनी टीम इंडियाची बाजू घेतली आहे.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 387 धावांवर आटोपला. त्यानतंर दुसऱ्या डावाची सुरुवात करण्यासाठी इंग्लंडचे फलंदाज मैदानात उतरले. दिवस संपण्यासाठी सहा ते मिनिटांचा कालावधी बाकी होता. त्यामुळे झटपट दोन षटके टाकण्याचा प्रयत्नात टीम इंडिया होती. परंतु सलामीला बेन डकेटसोबत आलेल्या जॅक क्रॉलीने रडारड सुरू केली. जसप्रीत बुमराच्या षटकात त्याने कारण नसताना वेळ वाया घालवला त्यामुळे शुभमन गिलची आणि त्याची बाचाबाच झाली. बोटाला दुखापत झाल्याचे सांगत त्याने फिजिओला बोलावले. त्याच्या या नाटकासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी सुद्धा त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.
रवी शास्त्री यांनी स्काई क्रिकेटवर बोलत असताना आम्ही याला तमाशा म्हणतो, असं म्हणाले आहेत. ते म्हणाले की, “जर मी भारताची टोपी घातली असती तर, मी हे सर्व केलं असतं. आम्ही त्याला तमाशा म्हणतो. मैदानावर हे सर्व करण्याची परवानगी आहे. तुम्हालाही हे हवं असतं. तुम्ही फक्त गुड मॉर्निंग आणि गुड गुड इव्हनिंग म्हणत घरी जाऊ शकत नाही. थोडीफार भांडण चालून जातात. जो पर्यंत मर्यांदा ओलांडली जात नाही तोपर्यंत मी याच्याशी सहमत.” असं रवी शास्त्री म्हणाले आहेत.