IND Vs ENG 5th Test – मोहम्मद सिराजची चुक महागात पडणार! हॅरी ब्रुक-जो रुटची दमदार खेळी, इंग्लंड भक्कम स्थितीत; पाहा Video

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेला पाचवा कसोटी सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने झुंजार फलंदाजीच प्रदर्शन केलं आहे. हॅरी ब्रुक (111) आणि जो रूट (88*) यांच्या भागीमुळे इंग्लंडने गड्यांच्या मोबदल्यात 300 चा आकडा पार केला आहे. टीम इंडिया विकेटच्या शोधात असतानाच मोहम्मद सिराजने सीमारेषेवर शतकवीर हॅरी ब्रुकचा झेल पकडला पण सीमारेषेला त्याचा पाय लागल्याने सर्वांचेच चेहरे पडले.

दुसऱ्या डावातील 35 व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रुकला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. तेव्हा तो फक्त 19 या धावसंख्येवर फलंदाजी करत होता. प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्याच चेंडूंवर हॅरी ब्रुकने मारलेला चेंडू मोहम्मद सिराजने झेलला परंतु तोल गेल्याने त्याचा पाय सीमारेषेला लागला आणि इंग्लंडच्या खात्यात 6 धावा जमा झाल्या. त्यानंतर हॅरी ब्रुकने धमाकेदार फलंदाजी करत आपलं शतक पूर्ण केलं. त्याने 98 चेंडूंचा सामना करत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 111 धावांची खेळी केली. त्याला आकाश दीपने बाद केलं. हॅरी ब्रुकच्या पाठोपाठ आता जो रूट सुद्धा शतकाच्या जवळ पोहोचला आहे. त्याने 134 चेंडूंचा सामना केला असून तो नाबाद 98 धावांवर खेळत आहे. हॅरी ब्रुक आणि जो रूटच्या भागीमुळे इंग्लंडने 4 गड्यांच्या मोबदल्यात 317 धावा केल्या आहेत. इंग्लंडला जिंकण्यासाठी आता फक्त 57 धावांची गरज आहे.