IND Vs PAK : हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याचं डायमंड स्टँडचं तिकीट 16 लाखांचं!

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या उभय संघांमध्ये लढत पाहण्यासाठी दोन्ही देशांमधील चाहते आतूर असतात. अशातच टी20 World Cup 2024 च्या माध्यातून हिंदुस्थानविरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्याची संधी चाहत्यांना आहे. 9 जून रोजी दोन्ही संघ आपापसात भिडणार आहेत. ICC ने या सामन्यासाठी तिकीटांची विक्री करण्यास सुरुवात केली असून तीकीटांची किंमत लाखांच्या घरात आहे. या तिकीटांच्या किंमती पाहून ललित मोदी चांगलेच भडकले आहेत.

अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये 2 जून ते 29 जून या कालावधीत टी20 वर्ल्ड कपचे सामने रंगणार आहेत. यापैकी 8 सामने अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. या 8 सामन्यांमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान या महामुकाबल्याचा सुद्धा समावेश आहे. आयसीसीने या सामन्यासाठी तिकीटांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या तिकीटांच्या किंमतीनुसार, तिकीटाची किंमत 300 डॉलर्स (सुमारे 25 हजार) पासून सुरु झाली आहे. तर डायमंड स्टँडच्या तिकीटाची किंमत तब्बल 20 हजार डॉलर्स म्हणजेच हिंदुस्थानी रुपयांनुसार 16.65 लाख रुपये इतकी आहे. गगनाला भिडलेल्या तिकीटांच्या किंमती पाहून ललित मोदी चांगलेच भडकले आहेत. सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट करुन त्यांनी राग व्यक्त केला.

लिलीत मोदींनी X (ट्वीटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. “आयसीसी हिंदुस्थान-पाकिस्तान या सामन्यासाठी डायमंड स्टँडचं तिकीट 20 हजार डॉलर्समध्ये विकत आहे हे पाहून धक्का बसला. फक्त नफा कमवण्यासाठी नव्हे तर या खेळाला प्रोत्सोहान देण्यासाठी आणि चाहता वर्ग जोडण्यासाठी हा विश्वचषक अमेरिकेत आयेजित केला जात आहे. 2750 डॉलरला (2.28 लाख रुपये) तिकीट विकणे म्हणजे क्रिकेट नाही,” अस म्हणत ललित मोदींनी आयसीसी आणि अमेरिकेच्या क्रिकेट असोसिएशनवर नाराजी व्यक्त केली.