IND vs SA पंत-राहुलची बालिश चूक! दोन्ही बॅटर क्रिजच्या एकाच बाजूला धावले पण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार्लमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या एक दिवसीय लढतीत एक जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. टीम इंडियाची प्रथम बॅटिंग करत असताना हा प्रसंग घडला. टीम इंडियाचे दोन्ही बॅटर क्रिजच्या एकाच बाजूला धावले, परंतु सुदैवाने दक्षिण आफ्रिकेने ढिसाळ क्षेत्ररक्षण केल्याने टीम इंडियाची विकेट वाचली.

सलामीवीर शिखर धवन आणि त्यानंतर आलेला विराट कोहली झटपट बाद झाल्याने टीम इंडियाचा डाव संकटात सापडला होता. कर्णधार केएल राहुल मैदानात शड्डू ठोकून उभा होता आणि त्याला साथ देण्यासाठी ऋषभ पंत मैदानात उतरला. पंधराव्या षटकात आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज गोलंदाजी करत होता आणि त्याचवेळी हा ड्रामा झाला.

षटकातील अखेरचा चेंडू पंतने मिडविकेटला टोलवला. नॉन स्ट्राईकला असणारा केएल राहुल रन घेण्याच्या उद्देषाने पळाला. परंतु पंतचा रन घेण्याचा इरादा नव्हता. याच दरम्यान क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला आणि नॉन स्ट्राईक एंडला फेकला. परंतु केशव महाराज चेंडू पकडू शकला नाही.

IND vs SA हात जोडून विनंती करतो, पण त्याच्याकडून गोलंदाजी करून घ्या! दिग्गजाची विनवणी

या दरम्यान पंत आणि राहुल एकाच क्रिजच्या बाजूला पोहोचले होते. क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू महाराजने पकडला असता तर राहुल रनआऊट झाला असता. विशेष म्हणजे महाराजच्या मागे बॅकअपला उभा असणारा खेळाडूही चेंडू पकडू शकला नाही. अन्यथा टीम इंडियाचा रनआऊटच्या रुपाने तिसरा धक्का बसला असता.

राहुलला जिवदान

दरम्यान, राहुलला त्याआधीही एक जिवदान मिळाले. पाचव्या षटकात लुंगि एनगिडीच्या चेंडूवर मलानने राहुलला कॅच सोडला. त्यावेळी राहुल फक्त एक धावेवर खेळत होता. त्यानंतर रनआऊट होता होताही तो वाचला. याचा फायदा घेत त्याने 55 धावांची खेळी केली.