INDvSL भुवनेश्वरचा बळींचा ‘चौकार’, टीम इंडियाचा श्रीलंकेवर 38 धावांनी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि श्रीलंकेत तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी रंगला आहे. या लढतीत टीम इंडियाने यजमान श्रीलंकेला 38 धावांनी पराभूत केले. भुवनेश्वक कुमार याने सर्वाधिक चार बळी घेतले, तर दिपक चहरने दोन बळी घेतले.

टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 165 धावांचे आव्हान श्रीलंकेला पेलवले नाही. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 18.3 षटकात 126 धावांमध्ये गारद झाला. लंकेकडून असलंकाने सर्वाघिक 44 धावा केल्या, तर अविष्काने 26 धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर कर्णधार शिखर धवन आणि संजू सॅमसन या दोघांत अर्धशतकीय भागिदारी झाली. सॅमसन 27 धावा काढून बाद झाला, तर धवनने 48 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादव याने 50 धावांची खेळी केली, तर ईशान किशन 20 धावा काढून नाबाद राहिला.