IND Vs SL Test Match – धडाकेबाज पंतचे अनोखे शतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऋषभ पंतची आजची खेळी ही संघासाठी निर्णायक ठरली. कारण केएल राहुल आणि देवदत्त पडीक्कल बाद झाले आणि त्यानंतर पंतने संघाचा डाव सावरला. पंतने यावेळी धमाकेदार फटकेबाजी करत फक्त आपले अर्धशतकच पूर्ण केले नाही तर त्याने आपल्या नावावर काही विक्रमही केले आहेत.

आपल्या तुफान फटकेबाजीने सतत चर्चेत असणाऱ्या हिंदुस्थानचा यष्टीरक्षक ऋषभने कसोटी क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ऋषभने कसोटीमध्ये सर्वात कमी वेळेत 100 षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत केवळ 51 सामन्यांमध्ये (89 डावांमध्ये) हा पराक्रम त्याने करून दाखवला आहे. ऋषभ आता कसोटीमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा अव्वल फलंदाज ठरला आहे. पंतने केवळ 51 सामन्यांमध्ये आणि 4,918 चेंडूंमध्ये आपले 100 षटकार पूर्ण केले. पंतने सामने आणि चेंडूंच्या बाबतीत इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि अॅडम गिलक्रिस्ट यांना मागे टाकले आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपला 100 वा कसोटी षटकार पूर्ण करण्यासाठी स्टोक्सने 82 सामन्यांमध्ये (151 डावांमध्ये) 9,042 चेंडूंचा सामना केला. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने 92 सामन्यांमध्ये (130 डाव) 6578 चेंडूंचा सामना करत 100 कसोटी षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता.