INDvSL अखेरच्या लढतीत टीम इंडियाचा पराभव, मालिका 2-1 ने जिंकली

तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या लढतीत यजमान श्रीलंकेने टीम इंडियाचा 3 विकेट्सने पराभव केला. श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडो याने सर्वाधिक 76 आणि भानुका राजपक्षे याने 65 धावांची खेळी केली. दरम्यान, पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने ही मालिका 2-1 अशी खिशात घालती.

पावसाने व्यत्तय आणलेल्या या लढतीत डकवर्थ ल्यूईसच्या नियमानुसार श्रीलंकेसमोर विजयासाठी 227 धावांचे आव्हान ठेवले. तत्पूर्वी पावसामुळे हा सामना 47 षटकांचा करण्यात आला. मात्र टीम इंडियाचा संघ संपूर्ण षटकंही खेळू शकला नाही आणि 225 धावांमध्ये बाद झाला.

टीम इंडियाकडून सलामीवीर पृथ्वी शॉ याने 49 धावा केल्या. पृथ्वीचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. पृथ्वीसह संजू सॅमसन याने 46 धावांचे योगदान दिले. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागिदारी झाली. या दोघां व्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने 40 धावा केल्या. इतर खेळाडू स्वस्तात माघारी परतल्याने चांगल्या सुरुवातीनंतरही टीम इंडियाला मोठी धावसंख्या रचता आली नाही.

श्रीलंकेकडून अकिला धनंजय आणि प्रविण जयविक्रमा यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. चमिराने 2, तर शनाका आणि करुनारत्नेने प्रत्येक 1 बळी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या