
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
टीम इंडियाचा कर्णधार ‘रनमशीन’ विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आपल्या दमदार कामगिरीच्या बळावर विराटने कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये पहिला नंबर मिळवला आहे. त्याचा हा फॉर्म वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यातही दिसून आला. विराटने विंडीजविरुद्ध 107 चेंडूत तडाखेबाज 140 धावांची खेळी केली. या खेळीसाठी त्याला सामनावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. परंतु सामना संपल्यानंतर बोलताना विराट असं काही बोलला की चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक
सामना संपल्यानंतर पुरस्कार वितरणावेळी विराट म्हणाला की, ‘या खेळाचा आनंद घेण्यासाठी माझ्याकडे आता खूप कमी वर्ष बाकी आहेत. देशासाठी खेळणं ही नक्कीच एक गर्वाची बाब आहे.’ तसेच क्रिकेटमध्ये तुम्ही कोणत्याही सामन्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. खेळाप्रति प्रामाणिक राहणे आवश्यक आहे, असेही तो म्हणाला. परंतु फक्त 29 वर्षीय विराटने आपल्याकडे क्रिकेटसाठी खूप कमी वर्ष बाकी आहेत हे वक्तव्य केल्याने चाहत्यांना शॉक बसला आहे.
द्विशतकांच्या बादशाहाचा दीडशतकांचाही विक्रम, सचिनला मागे टाकले
दरम्यान, विराटच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्याला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले असून 2031 मध्ये होणाऱ्या विश्वचषकात पाहण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
@imVkohli Bhaiya Please Yeh Mat Bola Karo That You Have Few Years Left You Will play Till 2031 World Cup I can’t Imagine Cricket Without you
— Virat Kohli ( Fan Club) (@ViratKo41183179) October 21, 2018
Virat Kohli: “I have few years left in my career to enjoy this sport ”
Come on champ please don’t talk about those days don’t know how we will face that day!#INDvWI
— VIRAT’S DHONI (@Cricketician_) October 21, 2018
I hope when Kohli says, “I have a few years left in me”, he means apart from the last 4 ones that he’ll spend just playing Test Cricket.
— KASHISH (@crickashish217) October 21, 2018
विंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात विराटसह रोहित शर्माने नाबाद दीडशतकी खेळी केली. विराट आणि रोहितच्या शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने विंडीजने विजयासाठी दिलेले 323 धावांचे आव्हान 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे.

























































