हिंदुस्थान-ब्राझील व्यापार करारावर स्वाक्षरी; व्यापार 20 अब्ज डॉलर्सच्या पुढे नेण्याचे ध्येय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि ब्राझील व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या दोन्ही देशांनी व्यापार 20 अब्ज डॉलर्सच्या पुढे नेण्याचे ध्येय ठेवले आहे. हिंदुस्थान-ब्राझील व्यापार करार पंतप्रधान मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्यातील चर्चेमुळे झाला आहे. त्यामुळे व्यापार, तंत्रज्ञान आणि एआय सहकार्याला एक नवीन दिशा मिळाली असून याला चालना मिळणार आहे.

हिंदुस्थान आणि ब्राझीलमध्ये व्यापार करारावर स्वाक्षरी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्यातील द्विपक्षीय चर्चेत दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत झाले. राष्ट्रपती लूला आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे हिंदुस्थानात स्वागत करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, राष्ट्रपती लूला आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना मला आनंद होत आहे. हिंदुस्थान-ब्राझील संबंधांना त्यांच्या दूरदृष्टी आणि प्रेरणादायी नेतृत्वाचा बराच काळ फायदा झाला आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की ब्राझील हा लॅटिन अमेरिकेतील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार २० अब्ज डॉलर्सच्या पुढे नेण्यासाठी दोन्ही देश वचनबद्ध आहेत. ते म्हणाले, “आमचा व्यापार केवळ एक आकडा नाही, तो परस्पर विश्वासाचे प्रतिबिंब आहे. अध्यक्ष लूला यांच्यासोबत येणारे मोठे व्यावसायिक शिष्टमंडळ या विश्वासाचे प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले.