Pahalgam Terror Attack हिंदुस्थानचा दणका! पाकिस्तानी जहाजांना हिंदुस्थानी बंदरात प्रवेश बंद

पाकिस्तानसाठी हिंदुस्थानची हवाई हद्द बंद केल्यानंतर आता हिंदुस्थानने पाकड्यांना आणखी एक धक्का दिला आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानी जहाजांना हिंदुस्थानच्या बंदरांवर प्रवेश बंदी केली आहे.

ज्या जहाजांवर पाकिस्तानचा झेंडा असणार आहे त्या जहाजांना हिंदुस्थानच्या बंदरात बंदी घालण्याचे निर्देश बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने दिले आहेत. देशाची मालमत्ता, मालवाहू जहाजे आणि बंदारांवरील पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील सूचना येईपर्यंत ही बंदी कायम राहिल असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच हिंदुस्थानी जहाजांना देखील पाकिस्तानच्या बंदरांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पोस्ट, पार्सल व आयात बंदी

हिंदुस्थानने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी झाली आहे. शनिवारी दुपारी हिंदुस्थानने हा निर्णय घेतला. त्या पाठोपाठ काही वेळातच हिंदुस्थानने पाकिस्तानातून येणाऱ्या पोस्ट व पार्सलवरही बंदी घातली आहे.