INDvBAN – इंदूर कसोटीत टीम इंडियाचा एका डाव राखून दणदणीत विजय

684

गोलंदाजांचा भेदक मारा व मयंक अगरवालचे द्विशतक यांच्या जोरावर टीम इंडियाने इंदूर येथे झालेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशचा एक डाव व 130 धावांनी पराभव केला आहे. हा विजय मिळवत टीम इंडियाने 2 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

पहिल्या पासूनच या सामन्यावर हिंदुस्थानची पकड होती. पहिला फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा संघ केवळ 150 धावांवर गारद झाला. त्यानंतर सलामीवीर मयांक अगरवालने नोंदवलेली 243 धावांची धडाकेबाज द्विशतकी खेळी आणि त्याला अजिंक्य रहाणे (86), चेतेश्वर पुजारा (54 ) आणि रवींद्र जाडेजा (नाबाद 60 ) यांची लाभलेली साथ यामुळे टीम इंडियाने 493 धावांवर डाव घोषीत केला. टीम इंडियाने 343 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा संपूर्ण संघ 213 धावात बाद झाला व टीम इंडियाने ही कसोटी एका डाव, 130 धावा राखून जिंकली.

आपली प्रतिक्रिया द्या