मुस्लिमांसाठी हिंदुस्थान सर्वोत्तम देश, कश्मीर खोऱ्यात अत्याचार नाही! सुफी संताचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि 35-अ रद्द केल्यानंतर खोऱ्यातील परिस्थिती आता सामान्य होताना दिसत आहे. 5 ऑगस्टनंतर पहिल्यांदाच कश्मीर खोऱ्यात सोमवारपासून मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. 72 दिवसानंतर खोऱ्यात मोबाईल सेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच दरम्यान जम्मू-कश्मीरमधील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी सुफी प्रतिनिधिमंडळ खोऱ्यामध्ये दाखल झाले. या प्रतिनिधीमंडळाचे सदस्य नसीरुद्दीन चिश्ती (Naseeruddin Chishti) यांनी ‘मुसलमानांसाठी राहण्यासाठी हिंदुस्थान सर्वोत्तम देश’ असल्याचे उद्गार काढले.

कलम 370 रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच केंद्र सरकारच्या प्रतिनिधिव्यतिरिक्त काही लोक खोऱ्यात परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी सोमवारी दाखल झाले. ‘अखिल भारतीय सुफी सज्जदानशी परिषद’चे प्रतिनिधिमंडळ सध्या तीन दिवसांच्या कश्मीर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक ठिकाणांना भेट दिली, लोकांशी चर्चा केली. प्रतिनिधिमंडळाचे अध्यक्ष नसीरुद्दीन चिश्ती (Naseeruddin Chishti) यासंबंधी बोलताना म्हणाले की, आम्ही अनेक स्थानिक लोकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी चर्चा केल्या. यादरम्यान त्यांनी एकदाही मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्याचे म्हटले नाही.

नसीरुद्दीन चिश्ती (Naseeruddin Chishti) हे अजमेर शरीफ दरगाहशी संबंधीत सुफी संत आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलता सांगितले की, आम्ही स्थानिक लोकांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मानवाधिकाराच्या उल्लंघनाबाबत काहीही विधान केले नाही. कश्मीर खोऱ्यात हिंदुस्थान मानवाविधाकाराचे उल्लंघन करत असल्याच्या अफवा आणि प्रोपोगंडा पाकिस्तान पसरवत आहे. यावेळी त्यांनी कश्मीर खोऱ्यात फोन सेवा बंद असल्याचे म्हटले. परंतु त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करण्यापूर्वीच खोऱ्यात फोनसेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. अखेर सोमवारी खोऱ्यातील 40 लाख फोन पुन्हा खणखणले.

मुसलमानांसाठी हिंदुस्थान सर्वात चांगला देश आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान जिहादसाठी आवाहन करत आहेत ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, असेही नसीरुद्दीन चिश्ती (Naseeruddin Chishti) म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानला एवढेच वाटत असेल तर मुसलमानांची गळचेपी होणाऱ्या फिलिस्तीन आणि चीनसोबत युद्ध करायला हवे. हिंदुस्थानसा सल्ला देण्याचा पाकिस्तानने प्रयत्नही करू नये.