‘सीईटी’चा निकाल जाहीर, 27 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी 2022) निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेला 4 लाख 67 हजार 379 विद्यार्थी बसले होते. त्यातील 27 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. पीसीबी ग्रुपमधून 13 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. यामध्ये मुंबईतील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे.