
फक्त लष्करच नाही तर देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी आम्ही करू असे सांगतानाच लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपले जवान सज्ज आहेत, असा अप्रत्यक्ष इशाराच नाव न घेता चीनला दिला आहे.
पूर्व लडाखच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी)चीनच्या कुरापती सुरूच आहेत.पॅगॉग लेकच्या दक्षिण किनाऱयावर चीनने घुसखोरी केली आहे.या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी दोन दिवसांचा लेह-लडाख दौरा केला.यावेळी ते ’एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलत होते.
काय म्हणाले लष्करप्रमुख
- गुरुवारी लेहमध्ये आल्यानंतर मी परिसराला भेटी दिल्या. अधिकाऱयांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. जवानांशीही बोललो आहे.
- जवानांचे मनोबल उंचावलेले आहे. कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जवान सज्ज आहेत.
- हिंदुस्थानचे लष्कर हे एक जगातले सर्कोत्तम लष्कर आहे.फक्त लष्करच नाही तर देशाला अभिमान वाटेल अशी आम्ही कामगिरी करू.
- गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सीमेवर थोडी तणावाची स्थिती आहे.देशाची सुरक्षा आणि अखंडतेचे रक्षण होईल यादृष्टीने जवानांची तैनाती केली जात आहे.
चर्चेतून प्रश्न सुटेल असा विश्वास
दोन्ही बाजूने राजनैतिक आणि लष्करी पातळीवर उच्चस्तरीय चर्चा सुरु आहे. शुक्रवारी चर्चेचा पाचवा राऊंड सुरू आहे.चर्चेतून मतभेद सोडविले जातील.चर्चेतून प्रश्न सुटेल असा मला विश्वास आहे असेही लष्करप्रमुख नरवणे यांनी सांगितले.

























































