देशात 60 लाखांपेक्षा जास्त कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात येत आहे. कोरोनातून बरे झालेल्यांचा आकडा 60 लाखांच्या वर गेला आहे. तसेच गेल्या आठ दिवसांत रोजचा मृतांचा आकडा एक हजाराच्या खाली आला आहे. कोरोनामुक्तीच्या बाबतीत हिंदुस्थानने जगाच्या नकाशावर वरचे स्थान कायम ठेवले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी ही दिलासादायक माहिती दिली.

देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत दिसून येत आहे. असे असले तरी या राज्यांत कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. या पाच राज्यांत देशातील कोरोना रुग्णांपैकी 61 टक्के रुग्ण असून देशाच्या 54.3 टक्के रुग्ण या राज्यांतून बरे झाले आहेत.

हिंदुस्थानात मागील 24 तासांमध्ये 89 हजार 154 रुग्ण बरे झाले आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 60 लाख 77 हजार 976 इतकी झाली आहे. रविवारी सकाळी 8 काजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशाचा एकूण रिकव्हरी रेट 86.17 टक्के आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी उभारलेल्या प्रभावी वैद्यकीय पायाभूत सुविधा, केंद्राच्या स्टॅण्डर्ड उपचार पद्धती प्रोटोकॉलचे सर्क राज्यांकडून होणारे पालन आणि डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने मृतांच्या संख्येत घट होत आहे. तसेच रुग्ण मोठय़ा प्रमाणात बरे होत आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि छत्तीसगढ या 10 राज्यांमध्ये बरे झालेले 80 टक्के रुग्ण आहेत. शनिवारी एकटय़ा महाराष्ट्रात सुमारे 26 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 70 लाख 53 हजार 807 होती. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 8 लाख 67 हजार 496 आहे.