
हिंदुस्थानने आज कोरोना चाचणीत नवा विक्रम केला आहे.आज देशभरातील चाचण्यांच्या संख्येने 21.15 कोटींचा (21,15,51,746) टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासात देशभरात एकूण 6,20,216 चाचण्या करण्यात आल्या.
देशातील चाचण्यांच्या प्रयोगशाळा आणि इतर साधनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, चाचण्यांची संख्या वाढवण्यात या प्रयोगशाळांची महत्वाची भूमिका आहे. आज देशात एकूण 2393 चाचणी प्रयोगशाळा असून त्यात 1,220 सरकारी आणि 1,173 खाजगी प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमुळे देशाची चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढली आहे.
सध्या देशात, राष्ट्रीय स्तरावर रुग्ण पॉझिटिव्ह असण्याचा दर 5.20% झाला आहे. प्रती दशलक्ष संख्येमागे दररोज चाचणी होणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. आज हिंदुस्थानात प्रती दशलक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात 1,53,298.4 चाचण्या केल्या जातात.
22 फेब्रुवारी 2021 पर्यंत लसीकरणाची एकूण 2,32,317 सत्रे झाली असून त्याद्वारे, आज सकाळी 8 वाजेपर्यंत 1,11,16,854 लाभार्थ्यांना लसीची मात्रा देण्यात आली आहे. यात, 63,97,849 आरोग्य कर्मचारी( पहिली मात्रा) 9,67,852 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा) आणि 37,51,153 पहिल्या फळीत कार्यरत कोरोनायोद्धे (पहिली मात्रा) यांचा समावेश आहे.
हिंदुस्थानात आतापर्यंत एकूण 1.06 कोटी रुग्ण (1,06,99,410) कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 97.22% टक्के इतका आहे. सक्रीय रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,05,49,355 (71.3 पट) ने अधिक आहे.
सध्या देशात, एकूण 1.50 लाख (1,50,055) सक्रीय रुग्ण आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या प्रमाणात सध्या असलेल्या सक्रीय रुग्णांचे प्रमाण 1.36% इतके आहे. गेल्या 24 तासांत, देशात 14,199 नवे रुग्ण आढळले.
महाराष्ट्रात आजही सर्वाधिक रुग्ण असून गेल्या 24 तासांत 6,971 रुग्ण आढळले. त्या खालोखाल 4,070 रुग्ण केरळमध्ये तर 452 रुग्ण तामिळनाडू मध्ये आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशात एकूण 83 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकूण मृत्यूपैकी 78.31% मृत्यू पाच राज्यांत झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 35 तर केरळमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला.




























































