हिंदुस्थानचा नवा उच्चांक; दिवसाला 9 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात कोविड-19 या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारी पातळीकर मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रतिदिन कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात येत असून गुरुवारी हिंदुस्थानात कोरोना चाचण्यांनी नवा उच्चांक गाठला. 24 तासांत 9 लाखांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. गुरुवारी चोवीस तासात 9,18,470 करोना चाचण्या करण्यात आल्या असून आजवर दिवसभरात झालेल्या या सर्काधिक चाचण्या ठरल्या आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3.26 कोटींकर पोहोचली आहे. दरम्यान, देशाचा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडण्याचा दर घसरला असून तो 8 टक्क्यांवर पोहोचला आहे.