
आशियाई 19 वर्षांखालील बॉक्सिंग स्पर्धेत हिंदुस्थानच्या युवा खेळाडूंनी 14 पदकांची कमाई करत इतिहास घडवला. यात 3 सुवर्णांसह 7 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यांत निशा, मुस्कान आणि राहुल कुंडू यांनी सुवर्णपदक मिळवत हिंदुस्थानचा थायलंडमध्ये तिरंगा फडकावला.
विशेष म्हणजे महिला गटात 10 पैकी नऊ खेळाडूंनी पदक जिंकले. यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 2 कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत हिंदुस्थानच्या खेळाडूंनी कझाकस्तान, उझबेकिस्तान आणि चीनसारख्या बलाढय़ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध दमदार खेळ केला. याशिवाय 22 वर्षांखालील गटात हिंदुस्थानला 13 पदकांची हमी मिळाली असून पाच खेळाडू सुवर्णपदकासाठी सोमवारी रिंगमध्ये उतरतील. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानने एकूण 40 सदस्यीय पथक उभे केले आहे.
महिला पदकविजेत्या
सुवर्ण पदक – निशा (54 किलो), मुस्कान (57), रौप्यपदक ः आरती कुमारी (75), कृतिका वासन (80), पर्ची टोकेस (80 किलोवरील), विनी (60), निशा (65)
कांस्यपदक – याशिका (51 किलो), आकांक्षा फलस्वाल (70 किलो)
पुरुष पदकविजेते
सुवर्णपदक – राहुल कुंडू (75) रौप्यपदक ः मौसाम सुहाग (65), हेमंत संगवान
पुरुष गटात तिघे फायनलमध्ये
युवा (19 वर्षांखालील) आशियाई बॉक्सिंग स्पर्धेच्या पुरुष गटात तीन हिंदुस्थानी खेळाडू सोमवार, 11 ऑगस्ट रोजी सुवर्णपदकाच्या लढतीसाठी रिंगमध्ये उतरतील. हिंदुस्थानी बॉक्सरांनी 22 वर्षांखालील गटातही आधीच 13 पदके पक्की केली आहेत. या गटातील अंतिम लढतीही सोमवारीच होणार आहेत. हिंदुस्थानने 19 वर्षांखालील व 22 वर्षांखालील गटात मिळून या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत एकूण 40 खेळाडूंचे पथक उतरविलेले आहे.