अर्थव्यवस्था का मंदावली? ‘जीएसटी’मुळे’

437

देशाची अर्थव्यवस्था मंदावली असून यासाठी वस्तू आणि सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी जबाबदार आहे अशी स्पष्ट भूमिका नीती आयोगाचे सदस्य आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे चेअरमन बिबेक देबरॉय यांनी मांडली आहे. वित्तीय तूट वाढण्याचे संकेतही देबरॉय यांनी दिले आहेत.

यापूर्वी रिझर्व्ह बँक आणि रेटिंग एजन्सी ‘मूडीज’ने 2019-20 या आर्थिक वर्षात हिंदुस्थानचा विकासदर घटणार असे म्हटले आहे. आता एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत बिबेक देबरॉय यांनी अर्थव्यवस्था मंदावली असल्याचे स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले देबरॉय?

  • ‘जीएसटी’मुळे देशाच्या आर्थिक विकासावर किती टक्के परिणाम झाला हे सांगणे अशक्य असले तरी परिणाम झाला हे निश्चित आहे. ‘जीएसटी’ची ज्या पद्धतीने अंमलबजावणी केली जात आहे त्यामुळे अर्थव्यवस्था मंदावत आहे.
  • ‘जीएसटी’चे मिळणारे उत्पन्न घटले आहे. 19 महिन्यांतील नीचांकी ‘जीएसटी’चा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे ‘जीएसटी’च्या दरांमध्ये सुधारणा करण्याची हीच योग्य वेळ आहे.
  • ‘जीएसटी’ दराचे पाच स्तर आहेत. त्यातील शून्य टक्के आणि 28 टक्के दर पूर्णपणे काढून टाकले पाहिजेत. 6 टक्के, 12 आणि 18 टक्के अशी दररचना पाहिजे.
  • चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 3.3 टक्क्यांपर्यंत आणण्याचे केंद्र सरकारचे टार्गेट आहे, मात्र हे टार्गेट गाठणे कठीण आहे.आयकर रचनेत बदल होऊ शकतो

केंद्र सरकारकडून आयकर रचनेत बदल केला जाऊ शकतो. कदाचित वैयक्तिक आयकर दर कमी होऊ शकतात, असेही देबरॉय यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या